हातखंबा येथे बेकायदेशीर दोन जुगार अड्डयांवर धाड

0

रत्नागिरी : तालुक्यातील हातखंबा येथे बेकायदेशीर दोन जुगार अड्यांवर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून सुमारे २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई दि. २७ मे रोजी करण्यात आली.

नारायण बाळकृष्ण बोरकर (५०), अरविंद बाळकृष्ण बोरकर (५४, दोन्ही रा. हातखंबा, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

यातील नारायण हा एक किराणा दुकानाच्यामागील बाजूस तर अरविंद हा चिकन सेंटरच्या मागील बाजूस बेकायदेशीरपणे जुगार चालवित असताना ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण २६ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या बाबत अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:58 PM 30-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here