चिपळूण : शहरातील उद्योजक नासीर खोत यांच्या गाडीला उक्ताड येथे अपघात झाला. या प्रकरणी अज्ञात अॅपे चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २८ मे रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास उक्ताड फाटा गणेश मंदिरानजीक घडली. या बाबत ओंकार माळी यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
उद्योजक नासीर खोत यांच्या मालकीची फोर्ड एन्डेव्होर ही गाडी घेऊन चिपळूणकडे येत असताना लाल रंगाच्या अॅपे रिक्षाने या गाडीला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये गाडीचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:18 PM 31-May-22