कळंबस्ते येथे तरुणाची आत्महत्या

0

चिपळूण : शहरालगतच्या कळंबस्ते ठिकाणी राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना दि. २८ मे रोजी सकाळी ११.३० वाजता उघडकीस आली. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

शैलेश श्रीधर मोरे (३२, कळंबस्ते) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबतची खबर राजेंद्र गंगाराम महाडिक (५८, खांदाटपाली, ता. चिपळूण) यांनी दिली. शैलेश याने खांदाट जुगाई धबधब्याच्या कडेवरील जाणाऱ्या पायवाटेवर असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी गेले होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:56 PM 31-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here