रत्नागिरी खबरदारच्या विनंतीनुसार संचारबंदीच्या काळात रुग्णांना घरी जाऊन सेवा देण्यासाठी डॉ. अभय धुळप सरसावले

0

रत्नागिरी : रत्नागिरीत संचारबंदी लागू झाली असून त्याची काटेकोर अंमलबजावणी होत आहे. याकाळात एखाद्या रुग्णाला वैद्यकीय सेवा मिळण्यात देखील अडचण निर्माण होऊ शकते. यासाठी रत्नागिरी खबरदारने रत्नागिरीतील सुप्रसिद्ध डॉ. अभय धुळप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रुग्णाच्या घरी जाऊन सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. रत्नागिरीतील इतरही डॉक्टरांनी या सेवेत सहभागी व्हावे असे आम्ही आवाहान करीत आहोत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

डॉ अभय धुळप यांनी रत्नागिरी खबरदारला असे कळवले आहे कि…
भारतासाठी पुढील काही आठवडे अत्यंत महत्वाचे आहेत. लोकांच्या निष्काळजीपणामुळे शासनाला दुर्दैवाने कर्फ्यु लावावा लागला आहे.परंतु आपल्याला कोणत्याही वैद्यकीय मदतीची गरज असेल( श्वासमार्गाशी संबंधित लक्षणे सोडून) मी आपल्यासाठी उपलब्ध आहे तुम्ही व तुमच्या प्रियजनांसाठी २४ तास . तुम्ही माझे नियमित पेशंट असा किंवा नसा सर्व गरजू रुग्णांसाठी मी उपलब्ध आहे. संपर्क क्रमांक ९४२२६६००७५ केव्हाही २४ तास. मी प्रत्यक्ष व्हीजिट करेन किंवा दूरध्वनीवर मार्गदर्शन करेन ( कृपया दूरध्वनीवर ट्रीटमेंटसाठी आग्रह करू नये कारण कायदा तसे करण्याची अनुमती देत नाही)
आपला डाॅक्टर अभय धुळप.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर

www.ratnagirikhabardar.com
09:52 PM 23/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here