आज एका दिवसात वाहतूक पोलिसांनी वसूल केला ६,२९,६०० रु. दंड, सांगत होतो ना, घराबाहेर पडू नका म्हणून

0

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या जमावबंदीच्या काळात वाहतूक नियमांचे उलंघन करणाऱ्यांकडून आज दिवसभरात वाहतूक पोलिसांनी ६ लाख २९ हजार ६०० रुपये दंड वसूल केला आहे. जमावबंदी काळात कुणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये अशा सूचना प्रशासनाकडून आधीच करण्यात आल्या होत्या. या काळात वाहतूक नियमांची देखील काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आधीच सांगण्यात आले होते. मात्र तरीही या गोष्टी गांभीर्याने न घेणाऱ्या अनेक वाहनचालकांना दंड बसला आहे. आज एका दिवसात हेल्मेट नसल्याबद्दल ९८१ वाहनचालकांना दंड करण्यात आला. त्यांच्याकडून ४,९०,५०० इतका दंड वसूल करण्यात आला. सीट बेल्ट न लावल्या बद्दल १३८ केस करण्यात आल्या व २७६०० दंड वसूल करण्यात आला. गाडीची कागदपत्रे सदर केली नाहीत म्हणून २४५ जणांकडून ४९००० रुपये दंड वसूल करण्यात आला. इतर अन्य केसेस मिळून आज दिवसभरात ६,२९,६०० इतका दंड वसूल केल्याची माहिती जिल्हा वाहतूक निरीक्षक अनिल विभूते यांनी दिली आहे.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:54 PM 23/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here