दापोलीतील अनधिकृत खोके धारकांवर होणार कारवाई

0

दापोली : दापोलीतील अनधिकृत खोके धारकांना दापोली प्रशासनाच्या वतीने नोटीस बजावण्यात आली असून, येणाऱ्या काही दिवसांत कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दापोली-दाभोळ रोडवरील काही खोक्यांची अवस्था तर अत्यंत भयानक आहे. लाकूड आणि प्लास्टिक यांच्या साह्याने उभे करण्यात आलेले खोके हे मोडकळीस आले असून या विद्रूप खोक्यांमुळे दापोलीचे सौंदर्य कमी होत आहे. अनधिकृत आणि मोडक्या खोक्यांवर दापोली नगरपंचायत प्रशासन आणि दापोली महसूल विभाग यांच्यामार्फत येत्या काही दिवसांत कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here