प्रशासनाला सहकार्य करा, संचारबंदीला साथ द्या : ना. उदय सामंत यांचे नागरिकांना आवाहन

0

आज आपण फार मोठ्या संकटाचा सामना करतोय… गो कोरोना गो म्हणून कोरोना जाणार नाही त्यासाठी आपली ईच्छाशक्ती मजबूत असणे गरजेचं आहे. आपण काही नियम पाळले नाहीत म्हणून आपणच आपल्यावर संचार बंदी लावून घेतली आहे… पोलीस प्रशासनला कठोर कारवाई करण्याची गरज नाही, त्यांना दॊष द्यायची गरज नाही… आपण वेळीच काटेकोर पणे वागलो असतो तर हि वेळ आली नसती. शासन , प्रशासनातील अधिकारी, पोलीस, डॉक्टर्स आपल्याला हेच सांगत आहेत की तुम्ही घरी रहा, आम्ही कोरोनाला पळवून लावतो… एवढ पण आपण करू शकत नाही का? ते घराबाहेर पडणाऱ्यांनी विचार करा आणि त्यातूनच जाणीवपूर्वक संचारबंदीचे नियम मोडायचे असतील तर अश्यां समाजकंटकांची गय करू नये अश्या स्पष्ट सूचना मी शासन म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी आणि दोन्ही पोलिस अधीक्षकांना केल्या आहेत. तरी कृपया आम्हाला तुमचं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. तसेच सगळ्यात महत्वाचे ज्यांनी ज्यांनी घरात थांबून प्रशासनाला सहकार्य केले आहे अश्या बहुसंख्य जनतेचं मी मनापसून कौतुक करतो, आभार मानतो … ३१ तारखे पर्यंत आपल्याला भारतातून कोरोना ला घालवायचाच आहे, या राष्ट्रीय मोहिमेत सर्वानी सामील व्हावं ही विनंती.

HTML tutorial

आपला
उदय सामंत
आपलं ठरलय, कोरोना विरुद्धची लढाई जिंकणारच!

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर

www.ratnagirikhabardar.com
10:24 AM 24/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here