रिक्षा चालकांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा विचार : परिवहन मंत्री ॲड. अनिल परब

0

पुणे : रिक्षा चालकांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा विचार आहे. कोरोनामुळे रिक्षा चालकांची आकडेवारी सरकारकडे आली आहे, असे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी सांगितले.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आळंदी रोड कार्यालयाच्या चाचणी मैदानावर उभारलेल्या २५० मीटर ब्रेक टेस्ट ट्रॅक आणि माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून उभारलेल्या हलक्या वाहनांसाठी रोलर ब्रेक टेस्टरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, आमदार सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे आदी उपस्थित होते.

शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मेट्रोसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात आहे, तो आवश्यक आहे. अर्थसंकल्पात एसटीसाठी तीन हजार बसचे नियोजन केले आहे. अजून काही खर्च होईल तो करूयात. पण एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करूयात, असे अजित पवार म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:09 PM 01-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here