वाटद-मिरवणे येथे आंतरराष्ट्रीय दुग्ध दिन व क्रीडाशिक्षक राजेश जाधव यांचा सत्कार समारंभ संपन्न

0

जाकादेवी/ वार्ताहर : रत्नागिरी तालुक्यातील ग्राम विकास मंडळ वाटद-मिरवणे संचलित खंडाळा इंग्लिश मिडियम स्कूल येथे १ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय दुग्ध दिन’ व झी २४ तास वाहिनीचा अनन्य सन्मान आदर्श क्रीडा शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार विजेते राजेश महादेव जाधव यांचा जन्मदिवस (वाढदिवस )मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कारखानीस यांनी शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्त्व असलेले खंडाळा-वरवडे हायस्कूलचे उपक्रमशील क्रीडा शिक्षक राजेश जाधव यांना शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देवून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ‘आंतरराष्ट्रीय दुग्ध दिनाचे औचित्य साधून मुलांना दूध वितरित करण्यात आले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय दुग्ध दिनाचे महत्त्व तसेच राजेश जाधव यांच्या कार्याविषयी माहिती यावेळी देण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:19 PM 01-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here