लांजा बसस्थानकात एसटी महामंडळाचा अमृत महोत्सवी पदार्पण कार्यक्रम साजरा

0

लांजा : एसटी महामंडळाने अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल लांजा बसस्थानकामध्ये बुधवारी १ जून रोजी प्रातिनिधिक स्वरूपात एका बसला सजवून आणि केक कापून महामंडळाचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम साजरा करण्यात आला.

१ जून रोजी एसटी महामंडळाची पहिली बस रस्त्यावर धावली होती. त्यानंतर आजतागायतत एक जून रोजी या दिवशी दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यानुसार बुधवारी अमृत महोत्सवी वर्षात महामंडळ पदार्पण करीत असल्याने लांजा बसस्थानकात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. बसस्थानक सजविण्यात आले होते. एका बसला प्रातिनिधिक स्वरूपात सजवण्यात आले होते आणि बसस्थानकात असलेल्या वृद्ध प्रवाशाच्या हस्ते केक कापून महामंडळाचा हा अमृत महोत्सवी पदार्पण सोहळा साजरा करण्यात आला.

यावेळी लांजा एसटी आगार व्यवस्थापक संदीप पाटील तसेच सहाय्यक वाहतूक अधीक्षक शुभांगी पाटील, वाहतूक निरीक्षक रमेश खानविलकर, वाहतूक नियंत्रक जयवंत जाधव या अधिकाऱ्यांसह एसटी डेपो कर्मचारी आणि प्रवासी वर्ग यावेळी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:38 AM 02-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here