बिवली गवळवाडी येथे महिलेस व मुलास मारहाण

0

चिपळूण : तालुक्यातील बिवली गवळवाडी येथे महिलेस मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० मे रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत विजया विष्णू भालेकर (वय ५५, रा. पवई-मुंबई, मूळ गाव बिवली) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार मारहाणीत त्या जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी दत्ताराम भालेकर, सावित्री दत्ताराम भालेकर, संतोष दत्ताराम भालेकर व सारिका संतोष भालेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजया भालेकर यांच्या गोठ्याजवळ येऊन या चौघांनी सामानाची हलवाहलव सुरू केली. यामुळे विजया भालेकर व त्यांचा मुलगा त्यांना अडविण्यास गेले असता या चौघांनी विजया यांचा हात अडवून मारहाण केली व त्यांच्या मुलाला देखील काठीने मारहाण केली. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

या प्रकरणी दत्ताराम सखाराम भालेकर यांनी परस्परविरोधी तक्रार दिली असून, त्यानुसार विजय विष्णू भालेकर व मिलिंद विष्णू भालेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:35 PM 02-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here