राजापूर आगारात एसटीचा अमृतमहोत्सवी वर्धापन दिन उत्साहात साजरा

0

राजापूर : एसटीचा ७५ वा अमृतमहोत्सवी वर्धापन दिन राजापूर एसटी आगारात उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी केक कापून आणि प्रवाशांना पेढे वाटून राजापूर आगाराच्या वतीने अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला.

१ जून रोजी एसटी महामंडळाला ७५ वर्षे पुर्ण झाली आहेत. एसटीचा हा अमृतमहोत्सवी वर्धापन दिन राज्यातील एसटी आगारात उत्साहात साजरा केला जात आहे. राजापूर आगारात आगारप्रमुख सागर गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत गावकर, मुंबईचे माजी नगरसेवक मारूती खेडसकर, प्रकाश नाचणेकर, स्थानक प्रमुख सचिन मोरे, तांत्रीक कार्यशाळा अधिक्षक प्रकाश झोरे, लेखापाल काका कांबळे, सुबोध बाकाळकर, अशोक दातार, अनिल कुवेसकर आदींसह आगारातील अधिकारी, कर्मचारी व प्रवाशी उपस्थित होते.

प्रारभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी आगारप्रमुखांसह प्रकाश कुवळेकर, नरेंद्र मोहिते यांनी मनोगत व्यक्त करून एसटीच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर केक कापून व उपस्थित सर्व प्रवाशांना पेढे वाढून एसटीचा हा ७५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:56 PM 02-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here