कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार

0

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

नवी दिल्ली : देशात कोरोनच्या संकटाचे काळे ढग अजूनच गडद होताना दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवार संध्याकाळी ८ वाजता पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार आहेत. यापूर्वी १९ मार्च रोजी पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले होते आणि जनता कर्फ्यूची घोषणा केली. त्यामुळे आता पंतप्रधान आज नवीन काय घोषणा करणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. जनता कर्फ्यूला देशातील जनतेने कडकडीत बंद पाळून मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. कोरोना विरोधात लढत असलेले डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यंत्रणा आदींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संध्याकाळी पाच वाजता टाळ्या वाजवाव्या, घंटानाद अथवा थाळीनाद करावा, या आवाहनालाही देशभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. काही अतिउत्साही लोकांनी त्यानिमित्ताने हुल्लडबाजी करून गालबोट लावले होते. कोरोनाच्या लढाईची पुढील दिशा काय असेल, हे पंतप्रधान आज सांगतील, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज लागणार असून त्यासाठी देखील पंतप्रधान देशातील दानशूरांना आवाहन करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here