पोयनार मानेवाडी रस्त्याचे उद्घाटन

0

मंडणगड : खासदार सुनील तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नाने मंजूर होऊन पूर्णत्वास गेलेल्या पोयनार मानेवाडी रस्त्याचे २९ मे रोजी माजी आमदार संजय कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उदघाटन करण्यात आले.

माजी जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास खेड तालुका अध्यक्ष स. तु. कदम, पोयनार ग्रामपंचायत सरपंच संदेश मोहिते, उपसरपंच राजेंद्र विचारे. ग्रामपंचायत सदस्य संतोष पाष्टे, ग्रामपंचायत सदस्या सृष्टी धूमक, अनिषा शिगवण, उज्ज्वला धमक, माजी सरपंच नारायण मोगरे, हरिश्चंद्र मोगरे, सुनील खताते आदींसह पदाधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्कार समारंभात बोलताना माजी आमदार संजय कदम म्हणाले, गावाच्या विकासकामांकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबध्द आहे. गावातील विविध कामे. प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. अजय बिरवटकर म्हणाले. खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, पर्यटन मंत्री अदिती तटकरे यांनी गावाच्या विविध समस्यांमध्ये लक्ष घातले असून पायाभूत सुविधा व विकासात्मक प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here