मंडणगड तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीमध्ये 6 जून रोजी आरक्षण सोडत

0

मंडणगड : माहे जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या मंडणगड तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींचे अंतिम प्रभाग रचना 27 मे रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

आता राज्य निवडणूक आयोगाने या 16 ग्रामपंचायतींचा आरक्षण कार्यक्रम प्रसिध्द केलेला आहे. यानुसार तहसीलदार मंडणगड दत्तात्रय बेर्डे यांनी या 16 ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण टाकण्यासाठी 16 अध्यासी अधिकारी यांची नेमणूक केलेली असून आरक्षण टाकण्याची कार्यवाही त्या त्या ग्रामपंचायतीमध्ये 6 जुन 2022 रोजी सकाळी 10.00 सोडत पध्दतीने टाकण्यात येणार आहे.

आरक्षण सोडतीसाठी संबधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक/ग्राम विकास अधिकारी याना विशेष ग्रामसभा आयोजित करणेबाबत तहसीलदार मंडणगड यांनी निर्देश दिलेले आहेत. ग्रामसभेस नागरिकांनी उपस्थित राहणेबाबत तहसीलदार मंडणगड यांनी आवाहन केलेले आहे.आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झालेल्या ग्रामपंचायती
अडखळ, बाणकोट, दहागाव, देव्हारे, दुधेरे-बामणघर, कुंबळे, लोकरवण, मुरादपुर, पिंपळोली, शिगवण, सडे, तिडे-तळेघर, वेसवी, विन्हे, घराडी, निगडी

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:42 PM 02-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here