राज ठाकरे यांचं भोंग्याबाबत जनतेला पत्र, मनसैनिकांकडून पत्राचं घरोघरी वाटप

0

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात घेतलेली भूमिका महाराष्ट्रात राजकीय तापमान वाढवताना दिसत आहे.

राज ठाकरेंच्या भूमिकेकडे साऱ्यांचंच लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता राज ठाकरे यांनी मनसैनिकांना भोंग्यांसंदर्भात एक पत्र देत ते पत्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी दिली आहे. यामुळे याचा आता राजकारणावर आणि जनतेवर काय परिणाम होईल हे पाहावं लागेल.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना भोंग्यासंदर्भात पत्र दिलं आहे आणि ते पत्र त्यांनी मनसैनिकांना आपापल्या भागातील नागरिकांना घरोघरी जाऊन द्यायला सांगितलं आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसैनिकांनी माहीम येथील मकरंद सोसायटीपासून मुंबईत हे पत्र नागरिकांच्या घरोघरी जाऊन वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. भोंग्याबाबत जनजागृती करणारे पत्र राज ठाकरे यांनी काढलं असून ते नागरिकांपर्यंत घरोघरी पोचविण्याचं आवाहन मनसे कार्यकर्ते यांना केलं आहे.

यानुसार नवी मुंबईतील सिवूड येथे मनसे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांनी पत्राचं वाटप सुरू केलं. त्यांनी सोसायटीमध्ये जाऊन मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील मनसेकडील भोंगे विरोधी पत्राचं वाटप केलं. मनसेमुळे महाराष्ट्र आणि देशभरात भोंग्याच्या आवाजाविरोधात चळवळ सुरू झाली असून यामध्ये आता सर्वसामान्य नागरिकांनीही उतरावं, असं आवाहन राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केलं आहे.

दरम्यान पोलिसांनी चेंबूरमधून काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. चेंबूरमध्ये काही मनसे कार्यकर्ते नागरिकांच्या घरोघरी जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या पत्राचं वाटप करत होते. यावेळी या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मनसे कार्यकर्त्यांना आरसीएफ पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आहे. विना परवानगी पत्र वाटप केल्याप्रकरणी पोलिसांनी आठ मनसैनिकांना ताब्यात घेतलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:45 AM 03-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here