हातखंबा पोलीस चेक नाक्यावरून दुचाकीवरून आलेल्या मुंबईकरांना आल्या पावली परत पाठवले

0

रत्नागिरी शहराच्या सीमा बंद करण्यात आल्या असून पोलीस दल काटेकोरपणे आत येणाऱ्या वाहनांची तपासणी करत असल्याचे पहावयास मिळत आहे. यातच ४ महाभाग मुंबईकर चार चाकी वाहनांना बंदी म्हणून चक्क दुचाकीने रत्नागिरीत येत होते. पोलिसांनी नाक्यावर अडवताच त्यांनी आम्ही मुंबईत ‘मातोश्रीच्या’ समोर राहतो अशा भूलथापा मारण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांनी त्यांच्या भूलथापांना बळी न पडता त्या मुंबईकरांना आल्या पावली परत मुंबईला जाण्यास सांगितले. करोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत रत्नागिरी पोलीस दल सर्वत्र तैनात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
01:48 PM 24/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here