राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी आवाहन

0

रत्नागिरी : दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सहसचिव (EE.D/ भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांनी सन २०२२ च्या शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतलेला आहे.

१ जूनपासून https://nationalawardstoteachers. education.gov.in या वेब पोर्टलवर नावनोंदणी सुरू झालेली आहे. इच्छुक शिक्षकांनी २० जूनपर्यंत राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here