इन्कमटॅक्स रिटर्न भरण्यास मुदतवाढ ; केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा

0

नवी दिल्ली: जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा भारतात मोठ्या प्रमणात फैलाव झाला आहे. दरम्यान देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण, अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदतीची त्यांनी घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर परतावा (इन्कमटॅक्स रिटर्न) भरण्यासाठी ३० जून २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. विवाद से विश्वास योजना, पॅन-आधार जोडणी, जीएसटी आणि आयकर रिटर्नसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. २०१८-१९ साठी ही मुदत वाढविण्यात आली आहे. इन्कमटॅक्स रिटर्न भरण्यास विलंब झाल्यास १२ टक्के विलंब शुल्क द्यावे लागत होते, त्यात कपात करण्यात आली असून ९ टक्के विलंब शुल्क करण्यात आली आहे. टीडीएसवरील व्याज दर १८ टक्क्यावरून ९ टक्के करण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:50 PM 24-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here