मंत्री उदय सामंत यांनी चिरायू भेटीत आधुनिक एम.आर.आय. मशीनची केली पाहणी

0

◼️ चिरायू हॉस्पिटल मधील नवीन सुविधेचे सामंत यांनी केले भरभरून कौतुक

रत्नागिरी : राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, रत्नागिरीचे सुपुत्र उदय सामंत यांनी रत्नागिरी शहराचे प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप येथील चिरायू हॉस्पिटलला शुक्रवारी सायंकाळी सदिच्छा भेट दिली. कोकणातील वैद्यकीय क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रुग्णांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या चिरायू हॉस्पिटलमध्ये अलीकडेच अत्याधुनिक एम.आर.आय. मशीन रुग्णांच्या सेवेत रुजू झाले आहे. या अत्याधुनिक मशीन आणि येथे दिल्या जाणाऱ्या सेवेची प्रत्यक्ष पाहणी करून मंत्री उदय सामंत यांनी येथील डॉक्टर्स आणि व्यवस्थापनाचे भरभरून कौतुक केले.

यावेळी मंत्री सामंत यांच्यासोबत शिवसेनेचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा परिषद माजी सभापती बाबु तथा महेश म्हाप, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष बंड्या‌शेठ साळवी, चिरायु हॉस्पिटल्सचे डॉ रमेश चव्हाण, डायरेक्टर् आनंद फडके, डॉ. सचिन यादव, स्त्रीरोग तज्ञ डॉ.ज्योती चव्हाण, डॉ.श्रीविजय फडके, डॉ.नीतिन चव्हाण, डॉ.अभिजित पाटील, डायरेक्टर राकेश चव्हाण, फ्युजिफिल्म्स कंपनीचे फ्रान्सिस कँरेन्टो, सँनरेड कंपनीचे डॉ.अनिरूध्द उन्नी व गणेश रामनाथ आणि मान्यवर उपस्थित होते.

प्रसिद्ध उद्योजक श्री. आर.डी.उर्फ अण्णा सामंत यांच्या शुभहस्ते अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या भारतातील पहिल्या एम आर आय स्कॅन मशीनचे उदघाटन अलीकडेच करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बी एन पाटील, उद्योजक दीपक गद्रे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

आत्तापर्यंत कोकणातील जनतेचा चिरायु हॉस्पिटलच्या सर्व रुग्णोपयोगी सुविधांसाठी नेहमीच सहभाग राहिला आहे. एम आर आय च्या काही तपासण्यांसाठी आजपर्यंत रुग्णांना कोल्हापूर, पुणे अथवा मुंबई येथे जावे लागत होते. परंतु, या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे एम आर आयच्या सर्व प्रकारच्या तपासण्या इथेच उपलब्ध होणार आहेत.

२००३ साली सुरू झालेल्या चिरायु हॉस्पिटलमध्ये वेळोवेळी नवीन सुविधा व तज्ञ डॉक्टर्स यांची भर पडत गेली आहे. सुरवातीला एकाच कुटुंबातील ४ सदस्य व १० बेड्स सहित सुरू झालेल्या या हॉस्पिटलचे रूपांतर कोकणातील अध्ययावत व सुसज्ज अश्या टरशरी केअर सेंटरमध्ये झाले असून आज चिरायू हॉस्पिटल मध्ये न्यूरोसर्जरी व स्पाईन सर्जरी सुविधा, जनरल सर्जरी व स्त्रीरोग तज्ञ, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया – हर्निया, अपेंडीक्स पासून ते आतडे व पोटावरील अवघड शस्त्रक्रिया,अस्थीरोग विभाग, सर्व प्रकारची फ्रॅक्चर, संधिवात, मानदुखी व कंबरदुखी, सांधे आखडणे,स्त्रीरोग व प्रसूती विभाग, वंध्यत्व चिकित्सा व उपचार, स्त्रियांच्या विविध समस्या, प्रसूती उपचार. नेत्ररोग विभाग यानंतर, नेत्ररोग विभाग,मेंदू विकार तज्ञ ,जनरल फिजिशियन, एंडोस्कोपी व कॅन्सर सर्जन, कान, नाक व घसा तज्ञ ,न्यूरो व स्पाईन सर्जन या वैद्यकीय सेवा दिल्या जातात. येथील अपघात विभाग देखील 24 तास कार्यरत आहे.

फुजी कंपनीचे एचलोन स्मार्ट एम आर आय मशिन हे भारतातील पहिले मशिन चिरायु हॉस्पिटल रत्नागिरीमध्ये सेवेत दाखल झाले आहे.

सध्या रत्नागिरीत उपलब्ध असलेल्या कोणत्याही एम आर आय स्कॅन मशीनपेक्षा कमी कालावधीत व जास्त अचूकपणे माहिती मिळून अतिशय क्लिष्ट आणि गंभीर व्याधींचे निदान करणे या मशिंम द्वारे शक्य होणार आहे.

या मशीनची वैशिष्ट्ये येथील डॉक्टरनी मंत्री सामंत यांना सांगितली. स्मार्ट कम्फर्ट – सर्वात मोठी कॅप्सूल व अत्यंत कमी आवाज, स्मार्ट क्वालिटी – हाय डेफिनिशन सुस्पष्ट इमेजेस व अचूक निदान.
स्मार्ट स्पीड – नेहमीच्या स्कॅनपेक्षा निम्म्या वेळेत स्कॅन अशी वैशिष्ट्ये आहेत. मशीन आणि येथील रुग्णसेवा याबाबत मंत्री सामंत यांनी कौतुक केले. तसेच आवश्यक ते सर्व सहकार्य भविष्यातील हॉस्पिटलच्या प्रगतीसाठी आम्ही निश्चितच करू, असेही सामंत म्हणाले.

ही सेवा पूर्वीप्रमाणे २४ तास उपलब्ध असेल. आजपर्यंत गेली अनेक वर्षे कोकणातील जनतेला चिरायु हॉस्पिटलने प्रामाणिकपणे सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. याचे स्मरण ठेवूनच एम आर आय स्कॅनच्या दरांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचे हॉस्पिटल प्रशासनाने निर्णय घेतला असल्याची माहितीही व्यवस्थापनाने मंत्री सामंत यांना दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:04 AM 04-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here