आर्यन क्लबतर्फे कै. दिगंबर नाचणकर स्मृती चषक खो-खो लीग स्पर्धा आजपासून

0

रत्नागिरी : येथील आर्यन क्लबतर्फे कै. दिगंबर नाचणकर स्मृती चषक खो-खो लीग स्पर्धेचे आयोजन ४ व ५ जून या कालावधीत करण्यात आले आहे.

आर्यन क्लबच्या खेळाडूंची ही स्पर्धा असून यामध्ये चार संघाचा समावेश आहे. ही स्पर्धा येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर होणार आहे. शनिवार दि. ४ रोजी सायंकाळी ५ वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल तर समारोप रविवारी होईल.

गेली अनेक वर्षे राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू घडवणाऱ्या आर्यन क्लब मार्फत नियमित सराव घेतला जातो. मे महिन्यातही उन्हाळी सराव शिबिराचे आयोजन केले होते. नियमित सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंना स्पर्धेचा अनुभव मिळावा यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. भविष्यात दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)

शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:08 AM 04-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here