कोकण रेल्वेच्या मुंबई-मडगाव मार्गावर ८ जूनला विशेष गाडी

0

रत्नागिरी : कोकण रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी येत्या बुधवारी (दि. ८ जून) मुंबई -मडगाव सुपरफास्ट वनवे स्पेशल ट्रेन धावणार आहे.

मध्य रेल्वेने मुंबई ते मडगाव अशी 01099 क्रमांकाची ही सुपरफास्ट एकेरी विशेष गाडी बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता मडगावला पोहोचेल. ही विशेष गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी या थांब्यांवर थांबणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:22 AM 04-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here