राजापूर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

0

राजापूर : तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना राजापूर-लांजासाखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी यांच्याहस्ते कृत्रिम अवयवांचे व विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. खा. विनायक राऊत यांच्या विशेष प्रयत्नाने हा उपक्रम हाती घेतला आहे.

राजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १ येथे तपासणी झाली होती. ज्येष्ठ नागरिकांसाठी कृत्रिम अवयव व साहाय्यभूत साधनांचा साहित्य वितरणाचा कार्यक्रम आबासाहेब मराठे कॉलेज राजापूर येथे पार पडला. सुमारे ५७३ पेक्षा जास्त लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव तसेच कर्णबधिर लोकांसाठी कानाची यंत्रे, व्हील चेअर, कमोड चेअर, काठी, मानेचा पट्टा, कमरेचा पट्टा यासारख्या सर्व साधनांचे वाटप करण्यात आले.

त्याप्रसंगी गटविकास अधिकारी सागर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी एस. एस. साळुखे, कामले, डॉ. शुभम पवार, मराठे कॉलेजचे प्राचार्य पवार, आस्था संस्थेच्या सुरेखा पाथरे व त्यांची सर्व टीम, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here