लांजा येथे तरुणाचा धरणात बुडून मृत्यू

0

लांजा तालुक्यातील गोविळ धनगरवाडी येथील बबन लांबोरे या ५४ वर्षीय प्रौढाचा लांजा शहरानजीकच्या बेनी धरणात रविवारी मृतदेह आढळून आला. शनिवारी सकाळी ६ वाजता नेहमीप्रमाणे बबन लांबोरे (वय ५४) हे लांजा येथील बाबू गांधी यांच्याकडे दुध काढण्यासाठी कामाला होते. त्यानंतर सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे दूध काढून घरी निघून गेले. मात्र, संध्याकाळी ते न आल्याने बाबू गांधी यांनी त्यांना फोन केला असता ते सकाळीच तुमच्याकडे निघून गेल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर बाबू गांधी यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी सर्वत्र रात्री उशिरापर्यंत शोधाशोध केली. मात्र, ते आढळले नाहीत. दुसऱ्या दिवशी रविवारी बेनी धरणावरील कोतवाल सुरेश साळुखे यांना एक दुचाकी धरणाजवळ आढळली. त्यानंतर यांनी धरणाच्या आसपास शोध घेतला असता त्यांना बबन लांबोरे यांचा मृतदेह जलाशयावर तरंगताना आढळून आला. लांजा पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यची नोंद करून अधिक तपास करत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here