खेड-दापोली मार्गावर भरधाव रिक्षाची दुचाकीला धडक

0

खेड : शहरातील सहजीवन हायस्कूल समोर खेड-दापोली मार्गावर दि. १ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एकजण जखमी झाला.

शहरातील कुंभारवाडा येथे सहजीवन कॉलेजच्या समोर सुनील सुरेश शिंदे (रा. चिंचघर, वेताळवाडी, ता.खेड जि. रत्नागिरी) हे त्यांच्या ताब्यातील रिक्षा (एम. एच. ०८ एच. १३९२) घेऊन दि. १ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास खेड ते चिंचघर गावाकडे जात असताना रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन रिक्षा बेदरकारपणे चुकीच्या बाजूने चालवून समोरुन येणाऱ्या दुचाकीला (एम.एच.०८ क्यु ०८४७) धडक देऊन अपघात केला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार शैलेंद्र मनोहर मोहिते (४७ रा. पोयनार, बोद्धवाडी ता. खेड, जि. रत्नागिरी) व अन्य एकजण यांच्या डोक्याला, पायांना, हातांना दखापत झाली. याप्रकरणी सुनिल शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:52 PM 04-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here