टिके येथील श्रीराम जन्मोत्सव सोहळा रद्द

0

रत्नागिरी : तालुक्यातील टिके येथील टिकेकर यांच्या खासगी मालकीच्या श्रीराम मंदिरात दि. २ एप्रिल रोजी होणारा श्रीराम जन्मोत्सव सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून खबरादारीसाठी यंदा श्रीराम जन्मोत्सव सोहळा रद्द करण्यात येत आहे. परिसरातील सर्व भाविकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे. तसेच कोरोनाबाबत घाबरून न जाता योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन टिके येथे टिकेकर बंधु यांनी केले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here