मुंबई : संचारबंदीसारखे निर्णय राज्य सरकारनं जनतेच्या हितासाठीच घेतले आहेत. यामध्ये कुणाचा वैयक्तिक स्वार्थ असण्याचं काही कारण नाही. आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका, कृपया घरीच रहा, अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मास्क किंवा औषधांची अवैध साठेबाजी करणाऱ्या असामाजिक घटकांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
