बॉलिवूड पुन्हा कोरोनाच्या विळख्यात

0

मुंबई : बॉलिवूड विश्व पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. दिग्दर्शक-निर्माता करण जोहर याच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर अनेक बॉलिवूड कलाकार कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे समोर आले आहे.

IMG-20220514-WA0009

आता अभिनेता शाहरुख खान यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत त्याला लवकर बरे वाटावे म्हणून शुभेच्छा दिल्या, तेव्हा ही गोष्ट समोर आली.

शाहरुख खान व्यतिरिक्त अभिनेत्री कतरिना कैफ हिला देखील कोरोनाची लागण झाली होती. कतरिना कैफ कोरोनाच्या विळख्यात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2021मध्येही कतरिना कैफ कोरोना पॉझिटिव्ह झाली होती.

शाहरुख खान आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त, बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यन याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी स्वतः कार्तिक आर्यनने ट्विट करून तोही कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. त्याने ट्विट करत लिहिले, ‘सर्व काही इतके पॉझिटिव्ह होत होते की, कोरोनालाही राहावले नाही…’

बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरलाही सध्या कोरोनाची लागण झाली आहे. लवकरच त्याचा अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट ‘ओम’ प्रदर्शित होणार आहे, ज्याचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण आता कोरोनामुळे त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशन प्लॅनमध्येही बदल झाला आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने स्वतः गेल्या महिन्यात कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरू होण्यापूर्वी ट्विट करून माहिती दिली होती की, तो कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे आणि अशा परिस्थितीत तो कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊ शकणार नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:01 PM 06-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here