चीन सरकार कोरोनाबळींची खरी संख्या लपवतंय….?

0

चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरातील अन्य देशांना आपल्या विळख्यात घेतलं आहे. जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3,79, 080 पोहोचली आहे. कोरोनामुळे 185 हून अधिक देश प्रभावित झाले असून, मृत्यूची संख्या 16,524 वर पोहोचली आहे. 1,02,423 रुग्ण हे बरे झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 4 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झालाय. एकट्या चीनमध्ये कोरोनाची बाधा झाल्यानं मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 3 हजार 270 आहे. मात्र आता कोरोना व्हायरस आमच्याकडे नाही, असा चीनने दावा केला आहे. तसेच चीनमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनामुळे एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, असं सांगण्यात येत आहे. परंतु गेल्या तीन महिन्यांत चीनमध्ये 2 कोटींपेक्षा जास्त मोबाईल युजर्सची संख्या घटली असल्याचा दावा अनेक मोबाईलच्या कंपन्यांनी अचानक केला आहे. मोबाईल युजर्सची संख्या अचानक कमी झाल्यामुळे याचा काही संबंध कोरोनाबळींशी जुळत नाही ना, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे. चीनमधील मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये 2.1 कोटी एवढी कमी झाली आहे. चीनच्या 19 मार्चला जाहीर करण्यात आलेल्या सरकारी अहवालामध्येही मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे चीनमध्ये कोरोनामुळे 3,270 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करणारं चीन कोरोनाबळींची संख्या लपवत आहे की काय, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. चीनमध्ये मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या घटली म्हणजे चीन कोरोनाबळींचा आकडा लपवत आहे असं होत नाही. चीनमधील अनेक कर्मचाऱ्यांकडे कंपनीकडून सिम कार्ड देण्यात आले आहे. मात्र कोरोनामुळे विविध कंपन्या बंद असल्यामुळे ते सिम कार्ड कर्मचारी वापरत नाहीत. त्यामुळे या अहवालात मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे, असं मत चीनमधील सॅनफोर्ड सी. बर्नस्टीन अँड कंपनीचे विश्लेषक ख्रिस लेन यांनी व्यक्त केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here