खेड येथील खुनाच्या गुन्हयातील आरोपीस अटक

0

खेड : सुरेश पेन्टप्पा कोळे, वय ३५ वर्षे, रा. धनगर गड्डा, इमनावत, ता. गुलबर्गा, जि. बिदर, कर्नाटक हे त्यांची पत्नी व दोन लहान मुलांसह रत्नागिरी जिल्हयामध्ये आले होते. कडक लक्ष्मीचा खेळ सार्वजनिक ठिकाणी दाखविल्यावर, त्यातुन मिळालेल्या पैशातून त्यांचा उदर निर्वाह चालतो.

दि.२०/०५/२०२२ रोजी वर नमुद सुरेश पेन्टणा कोळे हे त्यांच्या वरील कुटुंबासह दापोली येथून भरणे नाका, खेड येथे सायंकाळी ५ वाजता आले. भरणेनाका पासुन जवळच असलेल्या घोले कॉपलेक्स या अपार्टमेंट समोरील मैदानात ते आले आणि सायंकाळनंतर मागुन आणलेले जेवण करून त्या मैदानात झोपले. मध्यरात्री नंतर सुमारे २ वाजता यातील अनोळखी आरोपी त्यांच्या जवळच बसलेला सुरेश कोळे यांना दिसला. त्यावेळी सुरेश कोळे ओरडल्याने त्यांची पत्नी सुध्दा जागी झाली व तो अनोळखी आरोपी निघुन जाण्यासाठी पत्नीने बडबडायला सुरुवात केली. त्यामुळे तो अनोळखी आरोपी तेथुन निघुन गेला. परंतू थोडया वेळाने जाड लाकुड घेवुन येवुन त्या आरोपीने सुरेश कोळे यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. सुरेश कोळे यांच्या पत्नीशी या आरोपीने लगटही केली. परंत तिने प्रतिरोध करून आरडा ओरडा केलेनंतर तो आरोपी तेथून निघुन गेला.

या घटनेबाबत खेड पोलीस ठाणे येथे गु. नो. क्र. १४८/२०२२, क. ३०७, ३५४ भा.दं.स.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

औषधोपचारासाठी सुरेश कोळे यांना सिव्हील हॉस्पीटल, रत्नागिरी येथे दाखल केले असता दि.२१/०५/२०२२ रोजी त्यांचा मृत्यु झाला.

या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग यांनी गुन्हयाचे स्वरूप लक्षात घेवुन विविध अधिकाऱ्यांची पथके तयार केली. या पथकांनी तसेच खेड पोलीस ठाण्याच्या पथकाने गुन्हयाच्या ठिकाणी भेट देवुन माहीती घेतली आणि पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली विविधांगी तपासाची दिशा ठरवली.

सदर तपास सुरू असताना सपोनि सुजित गडदे, नेमणूक खेड पोलीस ठाणे यांना मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे अधिक खात्री केली असता, वर नमुद गुन्हा आरोपी नामे दिनेश दत्ताराम चाळके, वय ४१ वर्ष, रा. सूकीवली, देवळवाडी, ता. खेड याने वरील गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने आज दि.०६/०६/२०२२ रोजी अटक करण्यात आली.

आज दि.०६/०६/२०२२ रोजी वरील अटक आरोपी दिनेश दत्ताराम चाळके यास मा. न्यायालयासमोर हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यास ०४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राजेश कानडे यांचे मार्गदर्शनाखली सपोनि सुजित गडदे हे करीत आहेत.

सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी (१) खेड पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक निशा जाधव, सपोनि सुजित गडदे, पोउपनि हर्षद हिंगे, योगेश मोरे, पोह रविंद्र शिंदे, मंगेश शिवगण, प्रकाश मोरे, अस्मीता साळवी, पोना विरेंद्र आंबेडे, मच्छिंद्र वळवी, पोशि अजय कडू, रोहीत जोयशी, किरण चव्हाण, संकेत गुरव, निलेश माने, सविता कलिंगणे, नम्रता पाटील, राम नागुलवार, राहुल कोरे, प्रकाश पवार यांनी, (२) स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, रत्नागिरी कडील पोह संजय कांबळे, मिलींद कदम, बाळू पालकर, विजय आंबेकर, राजेश आखाडे, पोना योगेश नावकर, दत्तात्रय कांबळे, (३) नियंत्रण कक्ष, रत्नागिरी कडील सपोनि प्रविण स्वामी, अमोल गोरे, (४) बिडीडीएस, रत्नागिरी कडील सपोनि चित्रा मढवी, (५) रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याकडील पोह रोशन सुर्वे, पोना संतोष करळकर व अन्य अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:28 PM 06-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here