कोरोनाशी दोन हात करण्यासाठी अत्यावश्यक बनलेल्या मास्क आणि सॅनिटायझरचा काळा बाजार सुरू झाला आहे. मात्र असा जर कुणी काळाबाजार करत असेल आणि ते जर शासनाच्या निदर्शनास आलं तर त्यांना जेलमध्ये टाकायलासुद्धा शासन मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
