रत्नागिरी शहरात काँग्रेसतर्फे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

0

◼️ रत्नागिरी शहरातील गरिबांना, रुग्णांना फळांचे वाटप

◼️ रत्नागिरीत काँग्रेस पक्ष वाढविण्याचा कायकर्त्यांतर्फे रमेश शाहा, राकेश चव्हाण यांचा निर्धार

रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांचा वाढदिवस रत्नागिरीतील काँग्रेस प्रेमी राकेश चव्हाण, रमेश शाहा, माजी उपनगराध्यक्ष बाळा मयेकर आणि असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी विविध उपक्रमांद्वारे साजरा केला.

कांग्रेसचे नेते रमेश शाहा, राकेश चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, अल्पसंख्यांक सेलचे हारीस शेकासन, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब मयेकर, अश्फाक काद्री, बिपीन गुप्ता, महिला प्रदेश सरचिटणीस रुपाली सावंत, काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष रिजवाना शेख, स्नेहा पिलणकर आणि अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते या वाढदिवसाच्या विविध उपक्रमात सहभागी झाले होते.

शहरातील झोपडपट्टी विभागात जाऊन काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी तेथील हातावर पोट असलेल्या मजुरांना फळ वाटप केले. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. पाणी जोडणीबाबत माजी उपनगराध्यक्ष बाळा मयेकर यांनी त्यांना आश्वस्त केले. रुग्णालयात जाऊन रुग्णांनाही पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी फळ वाटप केले. एका ठिकाणी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात काँग्रेसतर्फे नेते रमेश शाहा यांनी पटोले यांना वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांतर्फे शुभेच्छा दिल्या. तसेच शहरात काँगेस संघटना मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच पटोले यांच्या कार्य कर्तृत्वाबाबत काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी कविताही सादर केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:35 PM 07-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here