राज्यसभा निवडणूक: महाविकास आघाडीने उघडपणे पाठींबा मागावा : ओवेसी

0

मुंबई : राज्यसभेत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेने मतांची जुळवाजुळव करण्यासाठी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षातील आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी कंबर कसली आहे.

तर दुसरीकडे भाजपाकडून सुद्धा जोरदार तयारी सुरु आहे. याचवेळी शिवसेनेने मतांसाठी एमआयएमच्या आमदाराला गळ घातल्याच्या बातम्या समोर येत आहे. यावर आता खुद्द एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आपली भूमिका मांडली आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपचा पराभव व्हायला हवा असेल तर, महाविकास आघाडीने उघडपणे पाठिंबा मागावा असं अशी भूमिका ओवेसी जाहीर केली आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत माहिती दिली आहे.

राज्यसभेत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेला अपक्ष आणि इतर पक्षातील आमदारांच्या मतदानाची गरज भासणार असल्याच स्पष्ट आहे. त्यामुळे आता ओवेसी यांनी दिलेल्या प्रस्तावावर महाविकास आघाडी काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. सोबतच शिवसेना काय निर्णय घेणार हे सुद्धा तेवढच महत्वाचे ठरणार आहे. ओवेसी यांची आज नांदेडमध्ये सभा होणार असून,त्याठिकाणी ते या सर्व घडामोडीवर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मतांसाठी मआयएमच्या आमदाराला गळ..

राज्यसभेत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवणाऱ्या शिवसेनेने मतांची जुळवाजुळव करण्यासाठी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षातील आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच शिवसेनेने मतांसाठी एमआयएमच्या आमदाराला गळ घातल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मंत्री दादा भुसे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी एमआयएमचे मालेगावमधील आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांना विनंती केली असल्याचे वृत्त आहे. दादा भुसे यांना पाठिंब्यासाठी आपली भेट घेतली होती, अशी माहिती मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:35 PM 07-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here