गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्थेत इंटरनेट बँकिंग सुविधेचा शुभारंभ

0

गुहागर : गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था आबलोली या पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात संचालक मंडळाच्या मासिक सभेत पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. रामचंद्र हुमणे गुरुजी, उपाध्यक्ष श्री.तुकाराम निवाते, संचालक प्रदिप बेंडल, संदेश कदम यांचेहस्ते इंटरनेट गुहागर UPI सुविधेचा शुभारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला.

यावेळी कुणबी नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालीका सौ.श्रावणी पागडे, संचालक अनंत पागडे, वैभव आदवडे, उदय गोरीवले, महादेव वणे, अमोल वाघे, संदिप पाष्टे, कार्यलक्षी संचालक अनिल घाणेकर, कर्मचारी वैभव बागवे, संजय आग्रे, संतोष हुमणे, संजय खापले, सुलक्षणा भूवड आदी उपस्थीत होते. यावेळी कार्यलक्षी संचालक अनिल घाणेकर यांनी इंटरनेट बँकिंग UPI या सुविधे बद्दल मौलिक माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here