बंद घर फोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास

0

रत्नागिरी : मुसळधार कोसळणाऱ्या पावसात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे धोधो पाऊस कोसळत असताना शहरात चोरट्यांनी डोके वर काढले आहे. बंद घरे आता चोरट्यांनी टार्गेट केली असून शहरातील अभ्युदयनगर परिरात मोठा डल्ला चोरट्यांनी मारला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाचणे अभ्युदयनगर येथे राहणारे जीवन वायंगणकर यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यामधील साडेचार लाख रुपयांचा ऐवज लांबविला आहे. वायंगणकर हे दहा दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. ते घरी परतल्यावर त्यांना बंगल्याच्या खिडकीचे गज वाकलेले दिसले त्यानंतर त्यानी घरात पाहणी केली असता चोरट्यांनी कपाट फोडून त्यामधील तीन लाखांचे दागिने एक लाखाच्या चांदीच्या वस्तू व पन्नास हजार रुपये रोख असा ऐवज चोरून नेल्याचे दिसून आले त्याबाबत त्यानी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भा. दं. वि. कलम ३८० गुन्हा दाखल केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here