रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पत संस्थेत ठेवींचा ओघ सतत सुरू असतो याच प्रत्यंतर 20 मार्च ते 24 मार्च या कोरोना चे आव्हान असलेल्या काळातही आले.या चार दिवसात54 लाखांचा ठेवी जमा झाल्या संस्थेची विश्वासार्हता जनमानसावर अधिराज्य करते आहे ह्याची ही पावती म्हणावी लागेल अस adv. दीपक पटवर्धन म्हणाले. आज संस्थेच्या ठेवी 198 कोटी झाल्या आणि उर्वरित 5 दिवसात 200 कोटींचा टप्पा पार करू असा विश्वास पटवर्धन यांनी व्यक्त केला. संस्थेच्या कर्जदार ग्राहकांना विशेष धन्यवाद देईन संस्थेची वसुली यंत्रणा आणि जबाबदारीने कर्तव्य पार पाडून नियमित वसुली भरणारे कर्जदार यांच्या उत्तम ताळमेळ असल्याने आज अखेर 99 .70%वसुली पूर्ण झाली आहे.इतक्या कठीण परिस्थितीत नियमित हप्ते भरणाऱ्या कर्जदार ग्राहकांना पटवर्धन यांनी कृतज्ञता पूर्वक धन्यवाद दिले आहेत उर्वरित वसुली साठी संबंधित कर्जदार सहकार्य करतील असे पटवर्धन म्हणाले. अर्थकारण शिस्थित आणि वक्तशीर पणे करावे लागते तरच विश्वासार्ह संस्था उभी राहते कोरोना मुळे अर्थकारण ठप्प आहे सर्वजण आर्थिक अडचणीत आहेत अत्ता सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी स्वतःला इतरांपासून विलग ठेवावे व कोरोना चा प्रसार प्रतिबंधित करावा हे आद्य कर्तव्य आहे. संस्थेमध्ये न येता ही विविध डिजिटल सेवा वापरत संस्थेकडे व्यवहार झाले ही गोष्ट आवर्जून नमूद करण्या योग्य आहे. सामाजिक बांधिलकी जपत स्वामी स्वरूपानंद आपल्या ग्राहकांसाठी काही आर्थिक पॅकेज देण्याचा निर्णय 31 मार्च नंतर करेल नियमित कर्ज फेड करणाऱ्या कर्जदारांना हप्ते वाढ आगर व्याज सवलत या बाबतही विचार करत आहोत . संस्थेचे ठेवीदार ,कर्जदार, पिग्मी दार हे सर्व घटक महत्वाचे आहेत या सर्वांच्या योगदाना वर संस्थेचे अर्थकारण यशस्वी आहे याचे उचित भान ठेवत आर्थिक पॅकेज बाबत निर्णय संस्था संचालक मंडळ करेल आलेले कोरोनाचे संकटामुळे मानवी जीवन तसेच अर्थकारण अडचणीत आहे या वेळी सहकाराचे तत्व जपत स्वामी स्वरूपानंद पत संस्था उचित निर्णय करेल असे प्रीतिपदान ऍड दीपक पटवर्धन यांनी केले
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
05:28 PM 24/Mar/2020
