गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्थेत संचालक, कर्मचा-यांना छत्र्यावाटप

0

गुहागर : गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था आबलोली या पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात संचालक मंडळाच्या मासिक सभेत पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. रामचंद्र हुमणे गुरुजी, उपाध्यक्ष श्री.तुकाराम निवाते, संचालक प्रदिप बेंडल, संदेश कदम यांचे हस्ते पतसंस्थेच्या संचालकांना आणि आबलोली शाखा, शृंगारतळी शाखा आणि हेदवी शाखेतील कर्मचा-यांना पावसाळ्या पूर्वी छत्र्या वाटप करण्यात आले.

पतसंस्थेची वसूली करणे मिटींगला येताना पावसाचा अडथळा येऊ नये यासाठी हा छत्रीवाटप कार्यक्रम पतसंस्थेच्या संचालकांच्या मासिक सभेत पतसंस्थेच्या आबलोली येथील प्रधान कार्यालयात नुकताच उत्साहात संपन्न झाला.

यावेळी कुणबी नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालीका सौ.श्रावणी पागडे, संचालक अनंत पागडे, वैभव आदवडे, उदय गोरीवले, महादेव वणे, अमोल वाघे, संदिप पाष्टे, कार्यलक्षी संचालक अनिल घाणेकर, कर्मचारी वैभव बागवे, संजय आग्रे, संतोष हुमणे, संजय खापले, सुलक्षणा भूवड आदी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here