आज बारावीचा निकाल; कोकण बोर्डातून २९ हजार ८६४ विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा; विद्यार्थ्यांत निकालाची उत्सुकता

0

रत्नागिरी : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल ८ जून रोजी जाहीर केला जाणार आहे. बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती.

तत्पूर्वी १४ फेब्रुवारीपासून कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात १९ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे.

कोकण बोर्डातून सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी कोकण बोर्डातून एकूण २९ हजार ८६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी रत्नागिरीत १९ हजार ४३३ तर सिंधुदुर्गातील १० हजार ४३१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

एकूण २९२ केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. कोविड -१९ महामारी काळानंतर यावर्षी पहिल्यांदाच बारावीची ऑफलाइन परीक्षा झाली असल्याने या निकालाची अधिक उत्सुकता आहे. मागील वर्षी राज्यातल्या दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांचे त्यांच्या नववी ते अकरावीच्या गुणांच्या आधारे विशिष्ट सूत्रानुसार मूल्यांकन करण्यात आले होते.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होतात. बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाल्यानंतर लगेच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात. मात्र यंदा दहावी, बारावीचेसहा ते सात पेपर होऊन सुद्धा अद्याप विनाअनुदानित शिक्षकांनी एकही पेपर तपासायला घेतलेला नव्हता. त्यामुळे शिक्षकांच्या पेपर तपासणीच्या बहिष्कारामुळे दहावी आणि बारावीचे निकाल उशिरा जाहीर होणार का? असा सवालही उपस्थित झाला होता. पण आता जून महिन्यात निकाल असल्यानं विद्यार्थी आणि पालकांची चिंता काहीशी मिटली आहे. अशातच उद्या बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:12 AM 08-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here