मॉरिशसमध्ये अडकले महाराष्ट्रातील सहा विद्यार्थी

0

अशोक चव्हाण यांचे मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

कोरोना विषाणुमुळे हिंदुस्थानात येणारी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाल्याने महाराष्ट्रातील नांदेडचे सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकून पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. नांदेड शहरातील रहिवासी असलेले संकेत पानपट्टे, ऋतुज माने, अनिरूद्ध कुलकर्णी, गौरव देशपांडे, अमरदीप जगताप आणि शंकर नादरे हे हॉटेल मॅनेजमेंटचे सहा विद्यार्थी चार महिन्यांपूर्वी इंटर्नशिपसाठी मॉरिशसला गेले होते. 24 मार्च रोजी ते हिंदुस्थानात परतणार होते. परंतु, विमानसेवाच रद्द झाल्याने ते मॉरिशसमध्ये अडकून पडले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here