बारावी निकाल Update: यंदाचा निकाल 94.22 टक्के; जाणून घ्या निकालाची वैशिष्ट्ये

0

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा निकाल हा ९४.२२ टक्के इतका लागला आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहता येणार आहे. यापूर्वी २०२१ मध्ये बारावी उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.६३ टक्के इतकी होती.

पुढील वेबसाइट्सवर पाहता येईल निकाल –

1) www.mahresult.nic.in
2) www.hscresult.mkcl.org
3) http://hsc.mahresults.org.in

महाराष्ट्र बोर्ड बारावी निकाल 2022 जाहीर

शाखानिहाय निकाल-
विज्ञान – ९८.३०
कला – ९०.५१
वाणिज्य – ९१.७१
व्यवसाय अभ्यासक्रम – ९२.४०

निकालाची ठळक वैशिष्ट्ये –

१. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांतील एकूण १४,४९,६६४ नियमित विद्याथ्र्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,३९,७३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,५६,६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व निकालाची टक्केवारी ९४.२२ आहे.

२. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ३५५२७ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३५३६८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १८७५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ५३.०२ आहे.

३. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९७.२१%) सर्वाधिक तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (९०.९१%) आहे.

४. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल ९५.३५ असून विद्यार्थ्यांचा निकाल ९३.२९ आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यापेक्षा २.०६% ने जास्त आहे.

५. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ६३३३ दिव्यांग विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६३०१ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६००१ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ९५.२४ आहे.

६. इ.१२ वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे. एकूण १५३ विषयांपैकी २४ विषयांचा निकाल १०० % आहे.

निकालाबाबत आक्षेप असल्यास काय करावं?
ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत आक्षेप असेल अशा विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर पाच कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांच्या अवधित संबंधित विभागाकडे ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागेल. त्यासाठी प्रतिविषय 300 रुपये भरावे लागतील.

गुणपत्रिका कधी मिळणार?
विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातर्फे १७ जूनला गुणपत्रिका दिल्या जातील.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:37 AM 08-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here