चिपळूण भाजप पदाधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांकडे मांडल्या समस्या

0

चिपळूण : भारतीय जनता पार्टी चिपळूण शहराध्यक्ष आशीष खातू यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन ग्राहकांच्या समस्या मांडल्या.

चिपळूण शहारातील वीजपुरवठ्यासंबंधी विविध समस्यांबाबत भाजपने अतिरिक्त कार्यकारी अभियंता हर्षितकुमार वाकोडे यांना निवेदन दिले. यावेळी शहर चिटणीस विनायक वरडेकर यांनी समस्या मांडल्या. शहरामधील तिन्ही केंद्रांवर तक्रार निवारणासाठी २४ तास फोन उपलब्ध करणे, त्याची माहिती लोकांसाठी प्रसिद्ध करणे, अधिकारी व अभियंत्यांनी वेळेत फोन न उचलणे, त्यांना फोन उचलण्यास सांगणे, शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या पंपाच्या लाइनचा वीजपुरवठा सुरळित ठेवणे, गेल्या वर्षी महा पुरामध्ये पूर्ण बाधित झालेल्या मुरादपूर सबस्टेशनबाबत योग्य उपाययोजना करणे, तेथे जाणारा रस्ता करणे, शहरासाठी असलेली ३३ केव्ही वीजपुरवठा लाइन जीर्ण झाल्याने ती लवकारत लवकर बदलणे, तातडीने लागणारे साहित्य सदैव उपलब्ध ठेवणे अशा मागण्या करण्यात आल्या.

शहर सरचिटणीस राम शिंदे यांनी गोवळकोट येथील ढवण नाक्याजवळील महाकाळ चक्कीजवळील मेन लाइन बदलण्याची मागणी केली. उपेंद्र बर्वे यांनी पाग जोशी आळीतील कैलासभवन परिसरातील विद्युत जनित्राचे कंडक्टर बदलण्यासाठी मागणी केली. जतिन घटे यांनी काविळतळी येथील समस्या मांडल्या. शहर कामगार आघाडी प्रमुख उल्हास भोसले आणि सुधीर पानकर यांनी कानसेवाडीतील समस्या मांडल्या.

यावेळी शहराध्यक्ष आशीष खातू, शहर चिटणीस विनायक वरवडेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दीपाशेठ देवळेकर, शहर सरचिटणीस राम शिंदे, परेश चितळे, युवामोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रभंजन पिंपुटकर, युवामोर्चा शहराध्यक्ष निखिल किल्लेकर, प्रणय वाडकर, आशीष जोगळेकर ,सुधीर पानकर, जतिन घटे, उल्हास भोसले, आमिर बाचीम, मंदार कदम, अमेय सुर्वे, सौ. शीतल रानडे आदी उपस्थित होते. वाकोडे यांनी मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता केली जाईल, असे आश्वासन दिले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:03 PM 08-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here