दारूच्या नशेत विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू

0

दापोली : तालुक्यामधील सालदुरे येथे दारूच्या नशेत विहिरीत पडून संतोष साळवी या ६३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार, दिनांक ६ जून रात्री ८ ते मंगळवार, दिनांक ७ जून सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान घडली.

ऋषिकेश बांद्रे यांनी दापोली पोलिस स्थानकात दिलेल्या खबरीनुसार, संतोष साळवी हे बांद्रे यांच्या स्वॉमिल मध्ये साफसफाईच्या कामाला होते. सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अति दारू सेवन करून ते राहात असलेल्या रूमकडे जात असताना तोल जाऊन विहिरीत पडले. विहिरीत बुडून गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. दापोली पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गोरे करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:47 PM 08-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here