गुहागरमधील अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने रत्नागिरीत आणले; कुठेच आश्रय न मिळाल्याने पुन्हा घरी सोडण्याची वेळ; तरुणावर गुन्हा दाखल

0

गुहागर : गुहागर तालुक्यात अल्पवयीन मुलीला दमदाटी करुन जबरदस्तीने तरुणाने पळवून नेले. मात्र कुठेच आश्रय न मिळाल्याने तिच्या घरी पुन्हा सोडण्याची नामुष्की तरुणावर ओढवली. मात्र तरुणीचे अपहरण प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री 10 वा. च्या सुमारास घडली.

मुलीचे आई-वडिल घरी नसल्याची संधी साधत तरुणाने रात्री मुलीला घराबाहेर बोलावले. आपल्या दुचाकीवर बसण्यास सांगितले. मात्र मुलीने नकार दिल्याने तिच्या कानशिलात व तोंडावर मारहाण केली व कपडे फाडले. तसेच तरुणाने एकत्रित काढलेले फोटो ऑनलाईन व्हायरल करेन अशी धमकी दिली. अखेर नाईलाजास्तव मुलगी त्याच्या गाडीवर बसली.

रात्री तो तिला घेवून रत्नागिरीत आला. राहण्यासाठी रुम शोधली मात्र मुलीचे आधारकार्ड नसल्याने कोठेही रुम मिळाली नाही. यानंतर रात्रीच्या वेळी कंटाळलेल्या या तरुणाने जयगड येथील आपल्या आत्येच्या घरी तिला आणले. मात्र आत्येने ही घटना तरुणाच्या घरी सांगितली. त्याचे वडील काका, भाउ, मामा जयगड येथे आले. त्यांनी एकत्र बसून विचार केल्यानंतर तिला तिच्या घरी सोडण्यास सांगितले. पहाटे 5.30 वा. च्या सुमारास मुलीला तिच्या घरी पडवे येथे सोडण्यात आले.

मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार शौबान अद्रुमन जांभारकर (पडवे, काताळे नवानगर) याच्यावर भादविकलम 363, 323, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:10 PM 08-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here