विधान परिषदेसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर; भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना संधी

0

मुंबई : राज्यसभेनंतर 20 जून रोजी राज्यातील 10 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुक होत आहे.

यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. नुकतंच भाजपने आपल्या 5 उमेदवारांची नावे जाहीर केली, त्यानंतर आता काँग्रेसनेही आपल्या दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

काँग्रेसकडून यंदा विधान परिषदेसाठी भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मोहन जोशी, सिद्धार्थ हत्ती अंबरे, हर्षवर्धन सकपाळ, सचिन सावंत, अतुल लोंढे यांच्या नावांचीही चर्चा होती. मात्र आता दिल्लीतून जगताप आणि हंडोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. सोनिया गांधी यांनी या दोन नावांवर सहमती दर्शवल्याची माहिती काँग्रेस सरचिटणीस मुकील वासनिक यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:46 PM 08-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here