रत्नागिरी : जिल्हाभरातील आरोग्य यंत्रणा कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट असतांना तालुक्यातील वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी उपचाराच्या नावाखाली गोरगरीब रुग्णांकडून पैसे उकळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा आरोग्य अधिकारी गरीब रुग्णांच्या खिशातील चिल्लर देखील सोडत नाही असे बोलले जात आहे. याबाबत एका महिलेने लेखी तक्रार केली आहे तसेच या घटनेचा एक व्हिडीओ देखील काढला आहे. ज्या आरोग्यकेंद्रात रुग्णांवर मोफत उपचार केले जातात तेथे चक्क आरोग्य अधिकारी पैसे उकळत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील आरोग्य अधिकाऱ्याबाबत यापूर्वी देखील तक्रारी होत्या. आता येथे देखील पैसे उकळले जात असतील तर गोरगरीब रुग्णांनी जायचं कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
06:30 PM 24/Mar/2020
