‘लाईफकेअर’च्या बस थांब्याचा शुभारंभ

0

चिपळूण : लाईफकेअर हॉस्पिटल येथे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बस स्टॉपचा शुभारंभ करण्यात आला आहे.

हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बस थांबा जवळ नसल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत होता. याबाबत दसपटी विभागाचे आरोग्यमित्र प्रथमेश शिंदे यांच्याजवळ चर्चा केली असता त्यांनी गुहागर आगाराचे व्यवस्थापक रवींद्र कांबळी व वैभव पवार, चिपळण आगाराचे रणजित राजेशिर्के यांच्याशी संपर्क साधला. त्याला सर्वच अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन काही फेऱ्यांना थांबा मिळण्यास मान्यता दर्शवली. ६ जून रोजी बस थांब्याचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे गरजू रुग्णांची खूप मोठी सोय झाली आहे.

हॉस्पिटल प्रशासनातर्फे डॉ. समीर दळवी, डॉ. विष्णू माधव, डॉ. हजैफा खान.डॉ. परकार. डॉ. परदेशी, श्री. पिरजादे व हॉस्पिटल व्यवस्थापकीय विभागाने प्रथमेश शिंदे तसेच दोन्ही आगार प्रमुखांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here