ना. उदय सामंतांकडून नियमांचे काटेकोर पालन, मंत्रीपदाचा लवाजमा बाजूला ठेऊन स्वतः गाडी चालवत घेतला संचारबंदीचा आढावा

0

रत्नागिरी : कोरोना पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा आढावा आज रस्त्यावर उतरून ना. उदय सामंतांनी घेतला. यावेळी नियमांचे काटेकोर पालन करीत आपल्या सोबत फक्त एक स्वीय सहाय्यक घेऊन शहरातील चेकपोस्ट वर जाऊन पोलीस अधिकाऱ्यांशी एकंदर परिस्थिती विषयक संवाद साधला. गाडीत सोबत असणाऱ्या माणसांची संख्या वाढू नये यासाठी स्वतः गाडी चालवत ना. उदय सामंत प्रत्येक ठिकाणी पोहचत होते. मारुती मंदिर येथे पोलीस अधिकारी, आरटीओ यांच्याशी पुढील काळात जीवनावश्यक वस्तूंचे वितरण कसे करता येईल याची चर्चा केली. या सर्व परिस्थितीवर ना. उदय सामंत स्वतः बारीक लक्ष ठेऊन असल्याचे दिसून आले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
07:38 PM 24/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here