नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. आज महिमा चौधरीने ब्रेस्ट कॅन्सरचा अनुभव शेअर केलाय. महिमा चौधरीने किमोथेरपी केली आहे. यामुळे तिच्या डोक्यावरील सगळे केस गेले आहे. मात्र या सगळ्या प्रकारातून ती घाबरली नाही. हिम्मतीने या परिस्थितीला सामोरी गेली आणि पालकांपासून ही गोष्ट लपवून ठेवली. अनुपम खेर यांनी महिमा चौधरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. ज्यामध्ये ती ब्रेस्ट कॅन्सरबद्दल सांगत आहे.
व्हिडिओमध्ये महिमा चौधरीने सांगितले आहे की, तिला स्तनाचा कर्करोग कधी आणि कसा झाला. अनुपम खेर यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी महिमा चौधरीला त्यांच्या ‘द सिग्नेचर’ या चित्रपटासाठी बोलावले, त्यावेळी अभिनेत्रीला स्तनाच्या कर्करोगाची माहिती मिळाली. मात्र, महिमाने तेव्हा चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
महिमाने व्यक्त केलं दुःख
ब्रेस्ट कॅन्सरबद्दल बोलताना महिमा चौधरी खूप रडली. व्हिडिओमध्ये महिमाने अनुपम खेर यांना सांगितले की, ‘माझ्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मी दरवर्षी रुटीन चेकअप करते, ज्यामध्ये रक्त तपासणी, सोनोग्राफी सर्व केले जाते. माझी सोनोग्राफी करणार्या डॉक्टरांनी मला सांगितले की, तुम्ही डॉक्टर मंदार यांना भेटा. जे ऑन्कोलॉजिस्ट आहेत. मी गेल्यावर ते म्हणाले की आम्ही बायोप्सी करू, बाकी काही होताना दिसत नाही. या पूर्व-कर्करोग पेशी आहेत, ज्यांना DCIS म्हणतात.
अशी मिळाली कॅन्सरची माहिती
काहीवेळा ते कर्करोगाचे रूप धारण करतात आणि काहीवेळा ते होत नाहीत. डॉक्टरांनी पुन्हा सांगितले की, तुम्हाला या पेशी काढायच्या आहेत की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. मी लगेच म्हणाले, प्लीज लगेच बाहेर काढा. त्यामुळे बायोप्सी केली आणि त्यात कॅन्सर निघाला नाही. अहवाल निगेटिव्ह होता पण तरीही मला ते सेल्स काढून टाकायचे होते. जेव्हा त्यांनी त्या पेशी बाहेर काढल्या आणि त्यांची बायोप्सी केली तेव्हा त्याने पाहिले की, आपल्याला कॅन्सरची लागण झाली आहे. महिमा चौधरीने स्वतः हा अनुभव शेअर केलाय.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:15 PM 09-Jun-22
