देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव प्रा. रामभाऊ घाणेकर यांचे निधन

0

देवरुख : (सुरेश सप्रे) देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पिञे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक व संस्थेचे माजी सचिव रामचंद्र उर्फ रामभाऊ घाणेकर (७२) यांचे दि. ८ जून रोजी दुपारी १ वाजता आकस्मिक निधन झाले.

रामभाऊ गेले काही दिवस ते आजारी होते. आपण विद्यार्थ्यांना शिकवले तसेच विद्यार्थ्यांना आपला उपयोग व्हावा या हेतूने त्यांनी देहदान केले. डेरवण हाॅस्पिटलने हि प्रक्रिया पार पाडली.

राम घाणेकर यांनी देवरुख येथे मादुकरी मागून शिक्षण घेतले.देवरुख हायस्कुल येथे लिपिक म्हणुन काम केले. देवरुख महाविद्यालयातही लिपिक म्हणुन काम करत बीकाॅम, एमकाॅमची पदवी मिळवत बॅंकिंगचे प्राध्यापक म्हणुन त्यांनी नावलौकिक मिळवला. तसेच त्यांनी संस्थेचे सचिव म्हणून अनेकवर्ष उत्तम प्रकारे काम करून संस्थेच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणुन त्यांनी लौकिक मिळवला. अकौंटन्सीचेही त्यांनी क्लास घेतले. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी विविधक्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. फणसवणे या संगमेश्वर जवळील मुळ गावीत्यांनी शेती मध्ये विविध प्रयोग केले होते. ओकांर पतसंस्थेच्या उभारणीत त्यांचे योगदान होते.

राम घाणेकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा डाँ.सौरभ, दोन विवाहित मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:04 PM 09-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here