मुक्या प्राण्यावर भ्याड हल्ला; अज्ञाताने बैलाचे तोडले पुढील दोन्ही पाय, तवसाळ तांबडवाडी येथील घटना

0

वरवेली : गुहागर तालुक्यातील तवसाळ तांबडवाडीतील दीपक वाघे यांच्या पाळीव बैलावर अज्ञात व्यक्तीने भ्याड हल्ला केला असून बैलाचे पुढील दोन्ही पाय तोडल्याची घटना घडली आहे. ऐन शेती हंगामात शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. एका महिन्यात ही दुसरी घटना आहे.

तवसाळ तांबडवाडीतील गुरे आजूबाजूच्या वाडीत/ गावात गेली असता त्यांच्यावर काही लोकं त्यांना मारहाण करून जखमी करत आहेत, विशेषतः त्यांच्या पायावर जोरदारपणे मारहाण करून त्यांना चालता येणार नाही अशी अवस्था करून ठेवत असल्याची माहिती शेतकरी दीपक वाचे यांनी दिली.

येथील शेतकरी यांचा बैल (रंग काळा) गेले १२ दिवसांपासून बेपत्ता होता, तरी त्याला घरची मंडळीनी शोधण्याचा अतोनात प्रयत्न केला, तरी तो काही केला सापडला नव्हता अचानक १२ दिवसांनी बैलाची खबर लागताच त्या ठिकाणी त्यांच्याच बाजुला असणाऱ्या रोहिले गाव ह्या ठिकाणी जंगलात पोहोचले, आणि त्यांना तो बैल तेथे बसलेला पाहिला, परंतू आश्चर्याची बाब म्हणजे त्याचे दोन्ही पुढचे पाय तोडलेले होते. म्हणजे तो कधीच उभा राहु शकणार नव्हता अशा अवस्थेत होता.

शेतकरी दीपक वाघे यांनी अशी शंका व्यक्त केली की, कोणाच्या बागेत किंवा कोणाच्या दारुच्या भट्टीत बैल गेला असावा त्याला बांधून त्याचे दोन्ही पाय तोडले असावे किंवा जंगलात डुक्करांसाठी लावलेल्या फासकीत (फास) अडकून त्याचे पाय तुटले असावेत. तरी आता शेताच्या ऐन हंगामात बैलाचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

अशा वाईट कृत्य करणाऱ्या इसमाविरुध्द कठोर कारवाई झालीच पाहिजे, पुढे अशी घटना होऊ नये यासाठी सर्व शेतकऱ्यांनी याची खबरदारी घेतली पाहिजे. अशा वाईट कृत्य करणाऱ्या लोकांची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी ते पोलिसांकडे तक्रार दाखल करणार आहेत, गावातील ग्रामपंचायत, पोलीस पाटील, तसेच तंटामुक्त समिती ने याची दखल घेणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी दीपक वाघे यांनी व्यक्त केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:08 PM 10-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here